
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना नाशिक मध्य मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना आणि देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव यांना उमेदवारीची संधी दिली आहे. सर्व उमेदवार सोमवारी (ता. २८) अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी (ता. २७) सायंकाळी राज्यातील ३२ उमेदवारांची यादी जारी केली. (Chance for Pawar from Nashik Central Sanap from East Jadhav from Deolali from MNS in assembly election )