

नाशिक : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि मविप्र माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त उपक्रमात 'म्युझियम ऑन व्हील्स' अर्थात फिरते संग्रहालय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना जगाच्या समृद्ध इतिहासाशी जवळून ओळख होण्याची संधी मिळणार आहे.