Resignation Submitted a Day Before Voting : चांदवड बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत १३ संचालकांनी सभापती संजय जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला.
चांदवड- चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव १३ विरुद्ध मतांनी मंजूर करण्यात आला आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे.