Ganesh Chaturthi 2024 : र्निविघ्न गणेशोत्‍सवासाठी पोलिस सज्‍ज! गर्दीच्‍या ठिकाणी बंदोबस्‍त, वाहतूक मार्गात बदल

Ganesh Chaturthi : लाडक्‍या बाप्पाच्‍या आगमनाची प्रतीक्षा संपली असून, सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण आहे.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on: 

Ganesh Chaturthi 2024 : लाडक्‍या बाप्पाच्‍या आगमनाची प्रतीक्षा संपली असून, सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण आहे. गणेशोत्‍सव र्निविघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिस विभागही सज्‍ज झाला आहे. गर्दीच्‍या ठिकाणी उत्‍सव काळात पोलिस बंदोबस्‍त राहणार असून, भाविकांच्‍या सुरक्षिततेसाठी तीन हजार पोलिस तैनात असतील. वर्दळीच्‍या ठिकाणी वाहतूक मार्गांमध्ये बदलही जाहीर केले आहेत. घराघरात गणरायांचे आगमन होणार असून, सार्वजनिक मंडळांनी उभारलेल्‍या आकर्षक मंडपांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना शनिवारी (ता.७) केली जाईल. (Changes in traffic route due to ganesh festival )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com