नाशिक: महात्मा बसवेश्वर हे भारतातील पहिले समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. समानतेवर आधारित समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या बसवेश्वर महाराजांच्या शिकवणीमुळे समाजसुधारणेची नवी दिशा मिळाली. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन एकतेने, प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने पुढे जावे. राज्य मागासवर्ग आयोगाने लिंगायत समाजातील पोटजातींची ओबीसींमध्ये समावेशासाठी शिफारस केली आहे. लवकरच या पोटजातींचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.