
निफाड : गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्याचा राजमार्ग असलेला नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अक्षरशः वाताहत झाली आहे. ‘खड्यात मार्ग की मार्गात खड्डे’ हे समजेनासे झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याचा त्रास मात्र तालुक्याच्या जनतेला होताना दिसत आहे. मात्र याचे प्रशासनाला काही देणेघेणे नाही. या संदर्भात नागरीकांनी आवाज उठवला की तात्पुरते डागडुजी करण्याचा कामकाज विभागाकडून केले जाते.