
Nashik Mahashibir : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवारी ( ता.२३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महाशिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी ५० हजार महिलांना जमा करण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (ता.२०) शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत सुक्ष्म नियोजनाचे आदेश दिले. (Chief Minister Deputy Chief in city on Friday )