
मालेगाव : राज्यात जनतेला दिलासा देण्यासाठी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील. मालेगावसह कसमादेसाठी वरदान ठरणारा नार-पार प्रकल्प प्राधान्यक्रमाने मार्गी लावू. तुम्हाला मालेगाव जिल्हा दिला असे समजा. शेतकरी व नागरिकांच्या जिल्हा बँकेत दोन हजार ७७ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत, यातून मार्ग काढून बँकेला दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. (Chief Minister Shinde assurance on Suppose that Malegaon district was )