
नाशिक : नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार, विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल करून आव्हान निर्माण केल्याने देवळाली, दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघांत त्याची परतफेड शिवसेनेकडून करण्यात आली. महाविकास आघाडीतही चांदवड-देवळा व इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये फूट पडली असून, समाजवादी पक्षाने मालेगाव मध्यमध्ये उमेदवार उभा करून काँग्रेसला दणका दिला. (Chief Minister Shinde imposed fine against Ajit Pawar in Fatafoot district in Mahayuti and Mahavikas Aghadi)