.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi 2024 : विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहे.. श्रींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी शुक्रवारी (ता. ६) बाजारपेठेत मूर्ती, सजावट व पूजा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली. सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्सव व आरास तयारीसाठी रात्रंदिवस एक करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून श्रीगणेशाच्या आगमनाची उत्सुकता होती. शुक्रवारी (ता. ६) घरगुती गणेश स्थापनेसाठी बहुसंख्य कुटुंब गणेशमूर्ती खरेदी करून घरी घेऊन जाताना दिसून आले. (citizen is ready to welcome of ganesh )