नाशिक शहर बससेवेला ८ जुलैला हिरवा झेंडा

Nashik city bus service
Nashik city bus serviceesakal

नाशिक : महापालिकेकडून सुरू होणाऱ्या शहर बससेवेला डबल बेल देण्याचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला असून, येत्या ८ जुलैला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. दरम्यान, बससेवा सुरू करण्यासाठी तीन दिवसांच्या ट्रायल रन यशस्वी झाल्याने प्रशासन सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. Nashik city bus service will start on July 8


२०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बससेवा महापालिकेने चालविणे बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्यानंतर सत्ताधारी भाजपने शहर बससेवेसाठी हालचाली गतिमान केल्या. सप्टेंबर २०१८ मध्ये ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचा ठराव महासभेत घेण्यात आला. त्यानंतर मे. ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रा. लि. पुणे व मे. सिटी लाइफलाइन ट्रेव्हल्स प्रा. लि. दिल्ली या ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली. बस ऑपरेटरसोबतच बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी दहा वर्षांचा करारनामा करण्यात आला. तीस मिडी डिझेल व १२० सीएनजी, वीस डिझेल व ८० सीएनजी बसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बस डेपोसह शेल्टर उभारणीचे काम सुरू असताना दुसरीकडे शासनाकडे ना हरकत दाखल्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. फेब्रुवारी २०२१ शासनाने परवानगी दिली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १४६ विविध मार्गांवर टप्पा वाहतुकीला परवानगी मिळण्याबरोबरच टप्पा दर मंजुरी दिली आहे. बुधवारपासून तीन दिवस ट्रायल रन घेण्यात आला.

Nashik city bus service
नाशिक रोड कारागृहातील 675 कैदी पॅरोलवर


देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बससेवेचे उद्‌घाटन होणार आहे. तसे निमंत्रण त्यांना शनिवारी (ता. ३) देण्यात आले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी ८ जुलैला बससेवेचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती दिली. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, ज्येष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते. महापौर कुलकर्णी यांनी शहरात प्रगतिपथावर असलेल्या विविध कामांची माहिती दिली.

Nashik city bus service
पुणे-नाशिक महामार्गावर प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com