

नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालय हद्दीत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बंदोबस्तासाठी गुजरात पोलिसांसह सीमा सुरक्षा दलाच्या पथकासह पोलिस यंत्रणा सज्जतेमुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर आयुक्तालय हद्दीमध्ये १२४९ बूथ आहेत.