

Nashik city mascot bird election; resounding victory for vulture.
Sakal
नाशिक : राज्यात आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत; मात्र नाशिकमध्ये चक्क पक्ष्यांचीच निवडणूक रंगल्याचे पाहायला मिळाले. नाशिक शहराचा अधिकृत 'मानचिन्ह पक्षी' (City Mascot Bird) कोण असावा, यासाठी झालेल्या अनोख्या निवडणुकीत कावळा विरुद्ध गिधाड अशी थेट लढत झाली. आज (१९ नोव्हेंबर २०२६) जाहीर झालेल्या निकालात गिधाडाने कावळ्याचा तब्बल ९५८ मतांनी पराभव करत नाशिकच्या मानचिन्ह पक्ष्याचा बहुमान पटकावला आहे.