.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या दोन दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन येऊन ठेपलेले असताना, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस सतर्क झाले आहेत. शहरातील गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांसह गणेश विक्री स्टॉल परिसरात पोलिसांच्या विशेष पथकांसह बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून (बीडीडीएस) कसून तपासणी केली जात आहे. येत्या शनिवारी (ता.७) लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. (City police on alert mode for Ganesh Utsav )