Nashik City Transport : बेशिस्त अन्‌ फ्रन्टसीट रिक्षाचालकांविरोधात कारवाई कधी!

Nashik News : बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे रविवारी (ता. ७) दंडात्मक कारवाई सुरू होती.
When transporting more passengers than the rickshaw puller's capacity
When transporting more passengers than the rickshaw puller's capacityesakal

Nashik News : बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक पोलिस शाखेतर्फे रविवारी (ता. ७) दंडात्मक कारवाई सुरू होती. विशेषतः विनाहेल्मेट, सीटबेल्टविरोधात शहरभर वाहतूक शाखेकडून ठिकठिकाणी ई-चलनाद्वारे कारवाई केली जात असताना दुसरीकडे मात्र फ्रन्सीट रिक्षा आणि ट्रिपलसीट दुचाकीस्वार बिनबोभाटपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत होते. त्याकडे मात्र वाहतूक पोलिसांकडून डोळेझाक केल्याचे दिसून आले. (Nashik City Transport rickshaws and triple seater two wheeler rider violate traffic rules)

त्यामुळे वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतूकव्यवस्था विस्कळित झाली आहे. वाहतूक सिग्नलवर सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन केले जाते. विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट वाहन चालविणे, ट्रिपलसीट दुचाकी चालविताना वाहनचालक सातत्याने दिसून येतात.

त्याचप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न वाजवून भरधाव ड्रायव्हिंग केली जाते. त्यामुळे शहरात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेतर्फे आयुक्तालय हद्दीमध्ये बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहर पोलिस वाहतूक शाखेच्या चारही विभागांतर्गत बेशिस्तांविरोधात कारवाई केली जाते आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवर रिक्षाचालकांकडून फ्रन्टसीट प्रवासी बसवून बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवून अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मुजोर रिक्षाचालकांमुळे चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. बस थांब्यांच्या जागेवर रिक्षा पार्क केल्या जातात. त्यामुळे सिटीलिंक बसला जागा राहात नाही. (latest marathi news)

When transporting more passengers than the rickshaw puller's capacity
Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

कॉलेज रोडवर रॅश ड्रायव्हिंग

रविवार असल्याने सायंकाळच्या वेळी कॉलेज रोड परिसरात नेहमीपेक्षा गर्दी कमी असते. याचा फायदा घेत तरुणाई त्यांच्या स्पोर्टस्‌ बाईकवरून कॉलेज रोडने रॅश ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. त्याचवेळी कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका याठिकाणी पोलिसांकडून बेशिस्तांवर कारवाईची मोहीम राबवीत होते. अशा रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांनाही पोलिसांनी दांडुक्याचा प्रसाद देण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होते आहे.

रविवारीही मोहीम

शहर वाहतूक शाखेच्या चारही विभागांत रविवार (ता. ७) असूनही विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट वाहनचालकांविरोधात शहरातील अनेक ठिकाणी शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे काही ठिकाणी वाहनचालकांनी कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार घडले.

"शहरात बेशिस्त वाहनचालकांविरोधात मोहीम सुरू आहे. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातही धडक कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत वाहने चालवावीत." - दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, युनिट दोन

When transporting more passengers than the rickshaw puller's capacity
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेस 2 कोटी 15 लाखाचा नफा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com