आजपासून आरके ते शालिमार मार्ग सिटीलिंकसाठी बंद

आजपासून आरके ते शालिमार मार्ग सिटीलिंकसाठी बंद
Published on: 
आरके ते शालिमार मार्ग आजपासून सिटीलिंकसाठी बंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : दिवाळीनिमित्त शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालीमार व नेपाळी कॉर्नर या मार्गांवरून धावणाऱ्या सिटीलिंक बस आणि मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे बदल लागू असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे. प्रवेशबंद मार्ग -दिंडोरी नाका (निमाणी) व मालेगाव स्टॅन्डकडून सीबीएस- शालिमाराकडे जाणारा मार्ग : पंचवटी कारंजा - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - नेपाळी कॉर्नर - शालिमार या मार्गावर सिटीलिंक बस आणि सर्व मोठ्या वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद राहील. पर्यायी मार्ग *दिंडोरी नाका (निमाणी) कडून सीबीएसकडे जाणाऱ्या बस : दिंडोरी नाका - पेठ फाटा - मखमलाबाद नाका - बायजाबाई छावणी - अशोकस्तंभ - सिद्धेश्वर मंदिर - रामवाडी - मखमलाबाद नाका - पेठ फाटा मार्गे पुढे जातील. * सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बस : सीबीएस - अशोकस्तंभ - चोपडा लॉन्स - जुना गंगापूर नाका - चोपडा लॉन्स - बायजाबाई छावणी - मखमलाबाद नाका - पेठ फाटा - दिंडोरी नाका मार्गे जातील. *दिंडोरी नाक्यावरून नाशिक व अंबडकडे जाणाऱ्या बस : काट्या मारुती सिग्नल - संतोष टी पॉइंट - कन्नमवार पूल - द्वारका सर्कल - मुंबई नाका सर्कल मार्गे नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतर भागात जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.