नाशिक: सिटीलिंक कंपनीकडून कमी उत्पन्न असलेल्या दहा मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीस रुपये प्रतिकिलोमीटरपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील सेवा बंद केली जाणार आहे. सिटीलिंक कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १२) झाली. त्यात निर्णय घेण्यात आला.