नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग सीमा निश्चित झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या तयारीत भाजप आघाडीवर असून, याच पक्षाकडे गर्दी दिसून येत आहे. भाजपने शंभर प्लसचे ध्येय निश्चित केले आहे. सद्यःस्थितीत प्रस्थापितांचा आकडा भाजपकडेच आहे. त्यामुळे सत्ता दृष्टिपथात दिसत आहे. भाजपकडे वाढती गर्दी लक्षात घेता विरोधकांकडे नाराजांची रीघ नको म्हणून स्वबळाचा नारा दिला जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची (शिंदे) कसोटी आहे.