Chandwad Accident Case: सिव्हिलचे वैदयकीय पथक तत्काळ घटनास्थळी दाखल; चांदवडच्या वैद्यकीय क्षेत्राने घेतली रुग्णालयात धाव

Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात मंगळवारी (ता. ३०) सकाळी झालेल्या बस अपघाताची घटना समजताच नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैदयकीय पथकाने चांदवड ग्रामीण रुग्णालय गाठले.
While treating injured patients at Chandwad Rural Hospital, District Surgeon Dr. Charudatta Shinde.
While treating injured patients at Chandwad Rural Hospital, District Surgeon Dr. Charudatta Shinde.esakal

Chandwad Accident Case : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात मंगळवारी (ता. ३०) सकाळी झालेल्या बस अपघाताची घटना समजताच नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैदयकीय पथकाने चांदवड ग्रामीण रुग्णालय गाठले. गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून तत्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात तर किरकोळ रुग्णांवर चांदवड ग्रामीण रुग्णालय व चांदवडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Nashik Civil medical team immediately rushed to spot chandwad accident)

चांदवडच्या राहुड घाटामध्ये थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील परिवहन महामंडळाच्या जळगाव-नाशिक बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पाच प्रवासी मयत झाले आहेत. या बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करीत असताना हा अपघात मंगळवारी (ता. ३०) सकाळी घडला.

अपघाताची माहिती कळताच, नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, झोनल अधिकारी डॉ. अनंत पवार, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ विष्णू पालवे, डॉ. मंडावत, डॉ. वाघमारे यांनी चांदवड ग्रामीण रुग्णालय गाठले. अपघातातील ९ गंभीर जखमी रुग्णांवर प्राथमिक उपचार करून तत्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

While treating injured patients at Chandwad Rural Hospital, District Surgeon Dr. Charudatta Shinde.
Chandwad Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर बस-ट्रकच्या अपघातात 4 ठार; 22 जखमी, 9 गंभीर

तत्पूर्वी मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठीची आगाऊ सूचना कळविण्यात आली होती. तर, ३५ रुग्णांवर चांदवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये चांदवडवरून उषाबाई सुभाष पाटील (५५, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा, जि. जळगाव) यांना मंगळवारी दुपारी दीड वाजता दाखल करण्यात आले.

त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, डॉ. अनंत पवार, डॉ. पालवे यांनी रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करीत प्लॅस्टर केले. वैदयकीय उपचारासाठी चांदवड शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जखमींच्या उपचारासाठी तत्काळ चांदवड ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. तसेच, चांदवडच्या नेमीनाथ जैन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्स, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, नर्सेस यांनीही उपचारासाठी धाव घेत जखमी प्रवाशांवर उपचार केले. किरकोळ जखमी प्रवासी रुग्णांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडून देण्यात आले.

While treating injured patients at Chandwad Rural Hospital, District Surgeon Dr. Charudatta Shinde.
Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com