BSNL
BSNLesakal

Nashik News : लासलगावला बीएसएनएल सेवेचा बोजवारा; 3 दिवसांपासून मोबाईल सेवा ठप्प

Nashik : मोबाईल कंपन्यात ग्राहक वाढविची तीव्र स्पर्धा असतानाच लासलगाव"बीएसएनएल‘ चा मात्र पुरता बोजा उडाला आहे.
Published on

Nashik News : मोबाईल कंपन्यात ग्राहक वाढविची तीव्र स्पर्धा असतानाच लासलगाव"बीएसएनएल‘ चा मात्र पुरता बोजा उडाला आहे. योग्य आणि तत्पर सेवा मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक दुरावत आहेत. उगाव जवळ बीएसएनएलचे काम सुरू असल्याने लासलगाव मध्ये ३ दिवसांपासून बीएसएनएलची मोबाईल सेवा पूर्णता विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. मात्र त्याकडे यंत्रणेचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. (nashik close BSNL service in Lasalgaon from 3 days )

भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच अचानक संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून वारंवार केल्या जातात. हीच गत इंटरनेट सेवेची आहे. इटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांचे व्यवहार खोळंबतात.

एवढेच नव्हे तर अनेकदा बँकांचे व्यवहारच बंद राहण्याची वेळ ‘बीएसएनएल’मुळे येत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी भ्रमणध्वनी सेवेतील गलथानपणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी अशी मागणी ग्राहक करत आहे.

BSNL
Nashik News : धुराळा उडवत रंगला वाहनांचा थरार! घाटात रस्त्यावर चालकांची तारांबळ

"बीएसएनएल‘ची शहरातील मोबाईल सेवा वारंवार खंडित होत असल्याने ते ग्राहकही इतर कंपन्यांची सेवा घेऊ लागले आहे. "बीएसएनएल‘कडे जो कर्मचारी वर्ग आहे, त्याचेही योग्य नियोजन केले जात नाही.गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हतबल झाले आहे.''-भानुदास बकरे,लासलगाव

''एकेकाळी बीएसएनएल चा सेवा ही नंबर एकची सेवा होती पण स्पर्धेच्या युगात बीएसएनएल सेवा न दिल्यामुळे बीएसएनएल सेवेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. त्यात तीन दिवसापासून बी.एस.एन.एल. ची सेवा सुमार दर्जाची झाल्याची दिसून येत आहे.''- महेंद्र राणा, उद्योजक, लासलगाव

"बीएसएनएल‘ची शहरातील मोबाईल सेवा वारंवार खंडित होत असल्याने ते ग्राहकही इतर कंपन्यांची सेवा घेऊ लागले आहे. "बीएसएनएल‘कडे जो कर्मचारी वर्ग आहे, त्याचेही योग्य नियोजन केले जात नाही.गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हतबल झाले आहे.''-गोटुशेठ बकरे, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

BSNL
Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com