Nashik CM Shinde Daura : मुख्यमंत्र्यांच्या रोड-शोने नाशिककरांना मनस्ताप!

Nashik News : ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नाशिककरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर काहींनी रोड-शोवर टीकाही केली.
Traffic in City
Traffic in Cityesakal

Nashik CM Shinde Daura : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो शहरातील मुख्य रस्त्यावरून करण्यात आला. मात्र यामुळे ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नाशिककरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर काहींनी रोड-शोवर टीकाही केली. (Nashik CM Shinde Daura road show traffic)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात पाचव्यांदा नाशिकला हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोडशोला जुना गंगापूर नाका येथून प्रारंभ झाला. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाभोवती साध्या वेषातील पोलीस अधिकाऱ्यांचे पथकही तैनात होते. तर, रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूकीला रोखण्यासाठी व पर्यायी मार्गाने काढून देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन केले होते. परंतु तरीही पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच तारांबळ उडाली.

मुख्यमंत्र्याचा रोड शो जुने गंगापूर नाक्यावरून गंगापूर रोडने जेहान सर्कल, कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर, नवीन पंडित कॉलनी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, खडकाळी, मुंबई नाका, भारतनगर मार्गे इंदिरानगर येथे रोड शोचा समारोप झाला. (latest marathi news)

Traffic in City
Eknath Shinde Video: "आताही बॅगा घेऊन आलोय...", चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, संजय राऊतांच्या आरोपाला दिले उत्तर

मात्र, या रोड शोमुळे जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. जेहान सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. अनेक वाहने वाहतूक कोंडीमुळे अडकून पडले. या कोंडीत सापडलेल्यांनी रोड शोच्या अयोग्य नियोजनावर तोंडसुख घेतले.

पोलिसांचीही तारांबळ

रोड शोसाठी सकाळची वेळ असल्याने त्याचवेळी अनेक जण कामानिमित्ताने घराबाहेर पडलेले असतात. नेमक्या त्याचवेळी रोड शो सुरू झाल्याने अनेकजण वाहतूक कोंडीत सापडले. तर, पोलिसांचीही वाहतूक कोंडी सुरळीत करताना तारांबळ उडाली. पोलिस उपायुक्तांनाही रस्ता कोंडीचा फटका बसला. 

Traffic in City
Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com