
नाशिक : लोकसभा, विधान परिषद त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ११० दिवसांसाठी लागलेली आचारसंहिता व जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुकीवेळी लागणारी आचारसंहिता लक्षात घेता महापालिकेचे यंदाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही निश्चित केलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठताना आताच दमछाक होत असल्याने विकासाचे अपेक्षित ध्येय गाठण्यावरही साशंकता आहे.