

निफाड, लासलगाव : जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, विशेषतः द्राक्षबागांचे अधिक क्षेत्र असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाठावरील गावात हा कडाका अधिक जाणवत आहे. तीन दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, गुरुवारी (ता. २८) ओझर एचएएल येथे ६.६ अंश सेल्सिअस, तर कुंदेवाडी येथे आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. लासलगाव परिसरात नऊ अंशापर्यंत तापमान खाली आल्याने थंडी वाढली आहे.