नाशिक- दफ्तर तपासणीवेळी कामातील अनियमितता, कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीतील दिरंगाई, सातबाऱ्यावरील प्रलंबित नोंदी, तसेच ऑनलाइन सेवांबद्दल जनतेच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आठ दिवसांत कामकाजात सुधारणा करावी, अशी तंबी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्वच तहसीलदारांना दिली आहे.