
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील परिमंडळ दोनमध्ये मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत पोलिसांनी २०७ गुन्हेगारांची तपासणी करीत तडीपार केलेल्यांच्या घरांची झडती घेतली. अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Combing operation in circle two of houses of Tadipaar )