Nashik ZP News : जि. प.च्या असमाधानकारक कामावर पालकमंत्र्यांचे ताशेरे; प्रशासनाला आठवड्याचा अल्टिमेटम

Nashik ZP : जिल्हा परिषदेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत उघड झाले आहे.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत उघड झाले आहे. ग्रामीण भागासह शहरातील निवासी घरांचे अतिक्रमण कायम करण्याची सूचना देऊनही जिल्हा परिषद व नगरपालिका विभागाने याची दखल न घेतल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढत अधिकाऱ्यांची भरबैठकीत चांगलीच कानउघाडणी केली. (Nashik zp marathi news)

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) त्यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या वेळी निवासी घरकुलांच्या अतिक्रमणाचा विषय चर्चेला आला. पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा परिषद ‘सीईओ’ आशिमा मित्तल व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी यांना चांगलेच धारेवर धरले.

मुंबईत कोण, कुठल्या प्रदेशातून आला आणि त्याने झोपडी उभारली म्हणून त्यांना आपण करोडो रुपयांची जागा मिळवून दिली. येथे आपल्याच गावात अनेक वर्षांपासून राहत असलेल्या व्यक्तीचे घर कायम करण्याचे आदेश असतानाही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. येत्या आठ दिवसांच्या आत १० हजार घरांचे अतिक्रमण कायम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

येत्या पंधरा दिवसांच्या आत पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कामकाजात सुधारणा झाली नाही तर कठोर कारवाईचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. विशेष म्हणजे, याच बैठकीच्या वेळी मालेगावचे गटविकास अधिकारी अनुपस्थित राहिल्याने पालकमंत्र्यांच्या नाराजीत अजून भर पडली. शासनाने अतिक्रमित घरांविषयी निर्णय घेतला. त्या वेळी परदेशी हेही उपस्थित होते.

Nashik ZP News
Nashik ZP News : जि.प.कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचा निकाल घोषित

त्यामुळे त्यांना या विषयाची सखोल माहिती असल्याचा दाखलाही दिला. नगररचना विभागाचे श्याम गोसावी यांनी सादर केलेली माहिती ही सहा महिन्यांपूर्वीची असल्याचा आक्षेप पालकमंत्री भुसेंनी घेतला. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल म्हणून उर्वरित सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट होत नाहीत. समस्या सोडविण्याची मानसिकता असेल तर प्रश्न निश्चितपणे सुटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सीईओ, कार्यकारी अभियंत्याचा वाद चव्हाट्यावर

नांदगाव तालुक्यातील शासकीय विश्रामगृहाच्या निर्लेखनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे दाखल झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रस्ताव निकाली निघत नसल्याने त्याचे पडसाद पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी उमटले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांना बोलावून घेत चांगलेच सुनावले.

प्रस्तावाची फाईलच बदलण्यात आल्याचा आक्षेप मित्तल यांनी घेतला; तर आपण फाईलमध्ये कुठलाही बदल न केल्याचे नलावडे यांनी सांगितले. पण, दोघांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने रवींद्र परदेशी यांनी वेळीच मध्यस्थी केली. या फाईलच्या आधारे तुमची चौकशी करणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik ZP News : जि.प.कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचा निकाल घोषित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com