
Nashik Police : जुने नाशिकमध्ये शुक्रवारी (ता. १६) दुपारी अचानक दंगल सुरू झाली. या दंगलीला सामोरे जाताना पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार जखमी झाले. तर काही अधिकारी, अंमलदारांनी दंगलखोरांना धाडसाने सामोरे जात आक्रमक झालेला जमाव परतावून लावला. वेळीच घेतलेल्या ‘ॲक्शन’मुळे दंगल नियंत्रणात आली काही तासात परिस्थिती सुरळीत झाल्याचे श्रेय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक शहर पोलिसांना ‘मॉरल सपोर्ट’ देत त्यांचे कौतुक केले. (Commissioner of Police Sandeep Karnik praised city police for providing moral support )