
नाशिक : अहमदनगर येथे पार पडलेल्या 35 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचे महिला व पुरुष संघाचे सर्वसाधारण विजेतेपद नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने पटकावले आहे. पारितोषिक वितरण सोहळ्याने शुक्रवारी (ता १०) स्पर्धेचा समारोप झाला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिस खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. अहमदनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ५ ते १० तारखेदम्यान या स्पर्धा पार पडल्या.