
नाशिक : त्र्यंबक रोडवर भरधाव पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असता, याप्रकरणी दाखल मोटार अपघाताच्या गुन्ह्याचा लोकअदालतीतून निकाल देताना वारसांना ९९ लाखांची तडजोड रक्कम विमा कंपनीमार्फत देण्यात आली. संबंधित कुटुंबाला जिल्हा प्रधान न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. तर, लोकअदालतीच्या माध्यमातून १९ दाम्पत्यांमध्येही दिलजमाई होऊन त्यांच्या सुखी संसाराला नव्याने प्रारंभ झाला आहे.