Nashik Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता कक्षाकडे तक्रारींचा ओघ वाढला; मतदान ओळखपत्राची प्रतीक्षा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे मतदान महिनाभरावर येऊन ठेपले, तरी मतदारांना ओळखपत्र मिळालेले नसल्याच्या तक्रारी आता आचारसंहिता कक्षाने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर येऊ लागल्या आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान महिनाभरावर येऊन ठेपले, तरी मतदारांना ओळखपत्र मिळालेले नसल्याच्या तक्रारी आता आचारसंहिता कक्षाने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर येऊ लागल्या आहेत. मतदान कार्डची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी आचारसंहिता कक्षाकडे यंत्रणाच नसल्याने मतदारांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे. (nashik Complaints of voters not receiving identity card to toll free number)

जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयात आचारसंहिता कक्ष सुरू केला. आचारसंहिता लागू झाल्यावर हा कक्ष उभारण्यात आला आणि सीव्हिजील या ॲपसह केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी १९५० हा टोल फ्री दिला आहे. या क्रमांकावर मतदानाशी निगडित सर्वाधिक फोन येतात. यात विशेषत: नवमतदारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यावर त्यांना मतदान कार्डच मिळालेले नाही.

अशा परिस्थितीत मतदान कसे करायचे, मतदार होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करतात, कोणत्या कागदपत्रांची आवश्‍यकता आहे अशा स्वरूपाच्या प्रश्‍नांचा भडिमार केला जात आहे. आचारसंहिता कक्षाला मतदान कार्ड सद्यःस्थिती जाणून घेण्याचा अधिकारच नसल्याने त्यांना उत्तर देणे शक्य होत नाही. मतदारांचे समाधान न झाल्यास ते वारंवार फोन करतात. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : आमदारही म्हणतात खासदार कमळाचाच...! शिंदे सेनेच्या मागणीला मुंबईत प्रत्युत्तर

गेल्या १२ दिवसांत तब्बल २१ फोन कॉल्स आले आहेत. याव्यतिरिक्त ३८ तक्रारी ऑनलाइन स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४ तक्रारी आचारसंहितेच्या चौकटीबाहेरील असल्याने त्या रद्द झाल्या. उर्वरित तक्रारी निकाली काढल्या आहेत. तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी आचारसंहिता कक्षाने नोंदवही ठेवली.

नवमतदारांच्या सर्वाधिक अडचणी

जिल्ह्यात १८ ते १९ या वयोगटातील ४६ हजार ६६४ नवमतदारांची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे २० ते २१ या वयोगटातील ७७ हजार ७१ मतदारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यावर त्यांना स्मार्ट मतदान कार्डची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत ऑनलाइन नोंदणी केलेल्या मतदारांना मतदान कार्ड मिळालेले नाही.

दहा खोडसाळ तक्रारी

निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून आजपर्यंत या अॅपवर विविध प्रकारच्या ३७ तक्रारी प्राप्त झाल्या. प्रशासनाच्या तपासणीअंती १० तक्रारी या खोडसाळ असल्याचे समोर आले. उर्वरित तक्रारींत विकासकामांचा कापडाने झाकलेला फलक उघडा पडला, वाहनांवर पक्षाचे झेंडे व नेत्यांचे छायाचित्र कायम आहे, तसेच शहरात राजकीय पक्षाचा उल्लेख व चिन्ह रंगविलेल्या भिंती कायम आहेत, अशा विविध स्वरूपाच्या तक्रारींचा यात समावेश आहे.

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवार अनिश्चिततेमुळे महायुतीमधील इच्छुकांची घालमेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com