Nashik News : वादग्रस्त स्वच्छता ठेक्याला न्यायालयाचा ब्रेक; प्रक्रिया पूर्ण करा, मात्र कार्यारंभ आदेश न देण्याची सूचना

Latest Nashik News : न्यायालय अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत पात्र ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश न देण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत.
Court
Courtsakal
Updated on

नाशिक : पाच वर्षासाठी शहर स्वच्छतेसाठी दिल्या जाणाऱ्या १७६ कोटी रुपयांच्या स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात न्यायालय अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत पात्र ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश न देण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. सध्या कार्यरत असलेल्या वॉटरग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अटींचा भंग झाल्याचा दावा करत महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी (ता. १७) झालेल्या सुनावणीत आदेश देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com