नाशिक : 'मी भावनांना कंटाळलोय, सामान्य माणसासारखं मला जगता आलं नाही, कुटुंबासाठी मी काही करू शकलो नाही. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,' असं लिहून अवघ्या 25 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनीअरनं (Computer Engineer) आपलं आयुष्य संपवलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरात गुरुवारी (28 ऑगस्ट) घडलेल्या या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.