
नाशिक : बहुप्रतीक्षित असलेल्या नाशिक-त्र्यंबक सहापदरीकरण रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. येऊ घातलेल्या सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाशिक-त्र्यंबक रस्त्याचा आराखडा सादर करण्यात आला आहे. पिंपळगाव बहुला ते पहिनेवाडी फाट्यापर्यंत १७.५ किलोमीटरचे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी नऊ मीटर असे अठरा मीटर काँक्रिटीकरण होणार आहे.