
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत असताना मतदान केंद्र अधिकारी नियुक्ती करताना गोंधळ झाल्याचे उघडकीस आले आहे. कार्यालयीन शिपायास थेट मतदान केंद्राध्यक्ष केल्याने त्यांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने या कर्मचाऱ्यांना काम करताना अवघडल्यासारखे झाले आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत एकूण चार हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत. तेथील मतदानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ३५ हजार ७९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. (Confusion in appointment of officers in office and worker in elections )