Nashik Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा; जिल्ह्यातील 15 पैकी 7 मतदारसंघांवर काँग्रेसकडून दावा

Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाल्यानंतर जिल्ह्यातही पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे मुलाखतीतून दिसून आले.
Nashik Vidhan Sabha Election
Nashik Vidhan Sabha Electionesakal
Updated on: 

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाल्यानंतर जिल्ह्यातही पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे मुलाखतीतून दिसून आले. यामुळे काँग्रेस पक्षाने यंदा जिल्ह्यातील सात मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. यातही काँग्रेसने नाशिक मध्य हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेरिटनुसार उमेदवार अन्‌ जागावाटप होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. (Congress claims 7 out of 15 constituencies in Vidhan Sabha Election district )

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दयनीय स्थिती होती. पक्षाकडे कोणही उमेदवारी घेण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे उमेदवाराची शोधाशोध करावी लागली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यातही धुळ्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पक्षाने बाजी मारली.

निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळाल्याने पक्षाची मरगळ दूर झाली. त्यामुळे काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी यंदा जोमाने कामाला लागली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांसह नेत्यांनी बैठका घेत पक्षांतर्गत वातावरणनिर्मिती केली. परिणामी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली. गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षाच्या मुलाखतीत १५ जागांसाठी तब्बल ६४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. (latest marathi news)

Nashik Vidhan Sabha Election
Nashik Vidhan Sabha Election 2024 : बंद लिफाफ्यात काँग्रेसकडून 4 नावे! शहरातील मध्य मतदारसंघावर अधिक जोर

इगतपुरी आणि नाशिक मध्य मतदारसंघात डझनभरापेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सात मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा या वेळी करण्यात आला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने नाशिक मध्य, मालेगाव मध्य, चांदवड-देवळा, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ लढविले होते. यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये पक्षाला यश मिळाले होते. यंदा मात्र पक्षाने या चारव्यतिरिक्त बागलाण, मालेगाव बाह्य हे मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी केली आहे.

याशिवाय गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडलेला नाशिक पूर्व मतदारसंघही पक्षाला पुन्हा मिळावा असा प्रयत्न आहे. यातही बागलाण मतदारसंघासाठी पक्ष जास्त आग्रही झाला आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीत जागावाटप होत होते. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेनादेखील जागावाटपात आहे. त्यामुळे हे जागावाटप करताना महाविकास आघाडीची कसरत होणार आहे.

प्रदेश आढावा बैठकीतही मागणी

प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १४) प्रदेश काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत जिल्हा काँग्रेसनेदेखील सात मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांबाबतदेखील बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Nashik Vidhan Sabha Election
Nashik Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांना 40 लाखांची खर्च मर्यादा; 2019 च्या तुलनेत 12 लाखांनी मर्यादा वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.