
नाशिक : उन्हाळ्यामध्ये गंगापूर धरणाची पाणीपातळी कमी होऊन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला तर तो सोडविण्यासाठी चर खोदून पाणीपुरवठ्याच्या जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासंदर्भात महत्त्वाच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीचा ठराव पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. सल्लागार नियुक्तीला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. गेल्या वर्षी मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिक व अहिल्यानगरमधील धरणातून ८. ६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले होते.