नाशिकमध्ये साकारणार ''सहकार संकुल''

नाशिकमध्ये साकारणार ''सहकार संकुल''
Published on: 
३३९०६ प्रस्तावित सहकार भवन नाशिकमध्ये साकारणार ''सहकार संकुल'' ६६.६१ कोटींच्या कामाला अंतिम मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या जागेवर ‘सहकार संकुल'' उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबवून लवकरच प्रत्यक्ष कामाला गती दिली जाणार आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील सारडा संकुल परिसरात सद्यस्थितीत असलेली इमारत सुमारे ६० वर्षे जुनी असून जीर्ण झाली होती. त्या अनुषंगाने आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ६६ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या शहरात वेगवेगळ्या भाड्याच्या इमारतींमध्ये विखुरलेली सहकार विभागाची सहा प्रमुख कार्यालये या संकुलामुळे एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे शासनाच्या भाड्यापोटी दरमहा होणारा एक लाख ८० हजार रुपयांहून अधिक खर्च वाचणार असून शेतकरी, सहकारी संस्था, पतसंस्थांचे सभासद आणि सामान्य नागरिकांची कामे अधिक जलद आणि सुलभ होणार आहेत. मुख्य सचिव समितीची मंजुरी मिळाल्याने लवकरच भूमिपूजन होऊन काम सुरु होणार आहे. (फरांदे फोटो घ्यावा) प्रस्तावित सहकार संकुलात सहकार विभागाची सर्व कार्यालये एकत्रित येणार आहेत. यामुळे सहकारा संदर्भातील कामांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार. ------------------------------- सहकार संकुलाची वैशिष्टे - १० मजल्याची इमारत, एकूण ८०८०.९० चौरस मीटर क्षेत्रफळ. - पाच वेगवान उद्वाहक, प्रशस्त वाहनतळ, बैठक सभागृह, निवडणूक कक्ष आणि अभ्यागत प्रतीक्षा कक्ष. - महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि हिरकणी कक्ष. - छतावरील सौर यंत्रणा, पर्जन्य जलसंचय, आधुनिक जैविक सांडपाणी प्रक्रिया. - सर्वसमावेशक अग्निशमन सुरक्षा यंत्रणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.