लाचप्रकरणात मालेगाव आयुक्त जाधव, पीएला घोटीत अटक

लाचप्रकरणात मालेगाव आयुक्त जाधव, पीएला घोटीत अटक
Published on: 
पान-१ साठी NSK26H33904 नाशिक : लाचप्रकरणी ताब्यात घेतलेले मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव व मागे रुमाल बांधलेला नीलेश पाटील. --------------------- मालेगाव मनपा आयुक्तांसह पीएला लाचप्रकरणी अटक ------------- ‘लाचलुचपत’ची घोटीत कारवाई : लेखापाल मालेगावातून ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२९ : निवृत्तीला दोन दिवस राहिलेले असताना ठेकेदाराच्या कामांची बिले बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी ४ टक्क्यांप्रमाणे तब्बल ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र शेषराव जाधव, त्यांच्यासह स्वीय सहायक नीलेश वसंतराव पाटील यांना गुरुवारी (ता.२९) घोटी येथून तर लेखापाल (अकाउंटंट) हरिश नथुराम डिंबर यास मालेगावातून अटक केली. तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---------- मूळ तक्रारदाराने ९ जुलै २०२६ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने प्राधिकारपत्र दिलेल्या दोन ठेकेदारांनी महापालिकेमार्फत केलेल्या कामांची दोन बिले आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा करण्यासाठी आयुक्त जाधव आणि स्वीय सहायक पाटील यांनी बिलाच्या रकमेच्या प्रत्येकी ४ टक्केप्रमाणे ८० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी १० जुलै आणि १३ जुलै २०२६ ला संशयित नीलेश पाटील याने बिलांची मंजुरी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करत ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि आयुक्तांना विचारून सांगतो असे म्हणत प्रोत्साहन दिले. त्यानंतर २४ जुलैला आयुक्त जाधव यांनी थेट स्वतः तक्रारदाराकडे ४ टक्के लाचेची मागणी करून ठेकेदाराच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तसेच, १३ जुलैला नीलेशच्या आणि १५ ऑक्टोबर २०२६ ला आयुक्त जाधव यांनी केलेल्या लाचेच्या मागणीस लेखापाल हरिश डिंबर याने प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. प्राप्त तक्रारी आणि पुराव्यांच्या आधारे मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत. ही कारवाई सापळा अधिकारी उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार, सहसापळा अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस निरीक्षक विकास लोंढे यांनी केली. १६-१ जाधव, पाटीलला घोटीत अटक कारवाई दरम्यान लाचखोर आयुक्त जाधव व स्वीय सहायक पाटील हे घोटी परिसरात असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. जाधव व पाटील हे दोघेही गुरुवारी (ता.२९) सकाळी मालेगावातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. सकाळी दोघांचे वाहन घोटीत असताना, दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांचे वाहन रोखले आणि दोघांना ताब्यात घेतले. डिंबर यास मालेगावातून ताब्यात घेतले आहे. कायदेशीर प्रक्रिया राबवून तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, या तिघांच्या निवासस्थानासह कार्यालयांची कसून झडती सुरू असून, आयुक्त जाधव व पीए पाटीलच्या घरातून मोठे घबाड हाती लागल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत हे झडतीसत्र सुरू होते. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com