Nashik Crime : चावा घेत केली स्वत:ची सुटका; अल्पवयीन मुलीचे धाडस

Latest Crime News : मुलीला अंधारात नेत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने संशयिताच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करून घेत पळ काढला.
crime
crimeesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला अंधारात नेत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने संशयिताच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करून घेत पळ काढला. संशयित नराधमाच्या अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर शहरात इतर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयितांनी पीडितांवर अत्याचार केल्याने याप्रकरणी दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com