सेकंड मेन
फोटो : B18118, B18119
नाशिक रोड : मागण्यांसाठी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयासमोर आंदोलन करताना कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात कौटुंबिक न्यायालयासमोर आंदोलन करताना.
--
सुधारित वेतनश्रेणीसाठी कर्मचारी आक्रमक
नाशिक रोड न्यायालयासमोर जोरदार आंदोलन
नाशिक रोड, ता. १७ : मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे न्यायालयांचे नियमित कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, पक्षकार आणि वकिलांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १३०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर तसेच कौटुंबिक न्यायालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरील आंदोलनात प्रमोद बोंदार्डे, सुनील बागुल, तुषार वडगुले, ज्ञानेश बागले, सुधीर बेदाडे, सुधीर खैरनार, पंकज शेंडे, मंगेश रोकडे आदी सहभागी झाले होते. कौटुंबिक न्यायालयातील प्रबंधक मंदा भुसार, प्रभारी प्रबंधक, लघुलेखक गुणवंत कोलते, दिया बर्वे, श्याम घुमरे, योगेश पाळदे, योगेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
बेमुदत संपामुळे न्यायनिर्णय, पुरावे नोंदविणे, नवीन प्रकरणे दाखल करणे, पुढील तारखा देणे आणि संगणकीय कामकाज अशा विविध प्रक्रियांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.