कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात न्यायालयाचे काम ठप्प

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात न्यायालयाचे काम ठप्प
Published on: 
पान एक मेन ----------------------- 12298 मालेगाव शहर: येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उपोषण करताना न्यायालयीन कर्मचारी. 09902 कळवण न्यायालयाच्या बाहेर बेमुदत संपावर बसलेले कर्मचारी. 27555 येवला : येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करताना कर्मचारी. 11211 नांदगाव : न्यायालयाबाहेर संपकरी न्यायालयीन कर्मचाऱ्यासोबत ॲड. युनूस शेख, ॲड. सचिन साळवे, ॲड. मयूरी ठोके आदींसह कर्मचारी. 10339 पिंपळगाव बसवंत : आंदोलन करताना न्यायालयीन कर्मचारी. 08870 निफाड : संपात सहभागी झालेले न्यायालयीन कर्मचारी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात न्यायालयाचे काम ठप्प बेमुदत आंदोलनास सुरुवात; पक्षकारांना न्यायाधीशांकडून पुढची तारीख सकाळ वृत्तसेवा नाशिक ता.१७ : सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.१७) पासून बेमुदत आंदोलनास सुरुवात केली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निफाड, येवला, पिंपळगाव, सटाणा, नांदगाव, मालेगाव आदींसह इतर न्यायालयातील संपूर्ण कर्मचारी न्यायालयाबाहेर आंदोलनास बसले. त्यामुळे न्यायालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन संपूर्ण कामकाज ठप्प पडले. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामावर मोठा परिणाम झाला. न्यायाधीश आणि वकील नियमित हजर असूनही कर्मचारी नसल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. न्यायालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे अडचणी सामोरे जावे लागले. तारीख असलेल्या पक्षकारांना न्यायाधीशांकडून पुढची तारीख देण्यात आली. मालेगावाला कामकाज ठप्प मालेगाव शहर : वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. न्यायालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने न्यायालयीन प्रशासकीय कामकाज, विविध प्रकरणांशी संबंधित प्रक्रिया आणि पक्षकारांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. कळवणच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग कळवण ता.१७ उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या संपात कळवण न्यायालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुधारित वेतनश्रेणीचा शासन निर्णय (जीआर) निर्गमित होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा कर्मचारी महासंघाने घेतला आहे. संपात कळवण न्यायालयातील संपदा दीक्षित, सहा. अधिक्षक बाळासाहेब मुंढे, स्टेनो जयेश पाखले, यशवंत शिरसाठ, रंगनाथ बागुल, सुभाष बागूल व. लिपीक, विजयेंद्र खंबाईत, पांडुरंग गवळी, भानुदास झिरवाळ, शरद नागपुरे, गौरव गावीत, महेश खैरनार, योगिता बच्छाव, भाग्यश्री महाजन, संजय जाधव, विष्णू धुळे, संजय सोनवणे, बेलिफ किशोर महाजन, शिपाई राहुल देसले सहभागी झाली. समान काम-समान वेतनासह पेन्शनची मागणी येवला : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान कामासाठी समान वेतन लागू करावे, तसेच नवीन कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप सुरू केला आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असून यात महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची शासनाने दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. अनंत लभडे यांनी हा संप लवकरात लवकर मिटवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी प्र. अधीक्षक किरण बेदडे, सोमनाथ पंडोरे, योगेश कुलकर्णी, नितीन पाटील, वैष्णव शेलार, चंद्रवदन भानुवंशे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. नांदगाव संपास वकील संघाचा पाठिंबा नांदगाव : १७ समान काम, समान वेतन या मागणीसाठी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारलेल्या बेमुदत संपात येथील न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाल्याने या संपाचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. आज न्यायालयात कुठल्याही प्रकारचे कामकाज न झाल्याने अनेक पक्षकार वकिलांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान येथील वकील संघाने संपात उतरलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत न्यायालय प्रवेशद्वाराच्या बाहेर झालेल्या आंदोलनात स्थानिक वकील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यासोबत सहभागी झाले. पिंपळगाव बसवंतला न्यायालयाबाहेर ठिय्या पिंपळगाव बसवंत : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार आंदोलने करूनही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी संपात पिंपळगाव बसवंत येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. पिंपळगाव बसवंत न्यायालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले. यावेळी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. निफाडला कामकाज ठप्प निफाड : येथील न्यायालयीन कर्मचारीही सहभागी झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे न्यायालयात कामानिमित्त आलेल्या पक्षकारांना आल्या पावली परतावे लागले असून वकिलांनाही या संपाचा फटका बसला आहे. दरम्यान, निफाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण गुंजाळ यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. तसेच वरिष्ठ पातळीवर या संपाबाबत तातडीने निर्णय घेऊन विस्कळीत झालेले न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. चौकट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - सुधारित वेतनश्रेणी लागू करा. - जुनी पेन्शन योजना लागू करावी. - आश्वासित प्रगती योजनेचे लाभ द्या. - शेट्टी आयोगाच्या शिफारशी लागू करा. - कर्मचाऱ्यांना सेवाकालीन आर्थिक प्रगतीचे प्रलंबित लाभ मंजूर करावेत. - अतिरिक्त कामाचा भार आणि प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.