esakal | होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’
sakal

बोलून बातमी शोधा

helpline

होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : कोरोना महामारीच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे आरोग्‍य व्‍यवस्‍थेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरणात (होम आयसोलेशन)मध्ये राहणाऱ्या कोरोनाबाधित रुग्‍णांना मार्गदर्शन उपलब्‍ध केले जाणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेतर्फे ‘आयएमए नाशिक कोविड हेल्‍पलाइन’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

ऑडिओ, व्डिडिओ कॉलद्वारे तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा जाणून घेता येईल सल्‍ला

सर्व फिजिशियन डॉक्टर्स मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोविडबाधित रुग्णांची सेवा करण्याचे काम अविरत करत आहेत. अशा वेळी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या विलगीकरणात असलेल्‍या नातेवाइकांसाठी मदत, योग्य सल्ला आणि उपचार मिळवून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या योजनेत सहभागी होताना शंकांचे निरसन दूर करून घेत स्‍वतःचे व कुटुंबीयांचे आरोग्‍य जपावे आणि कोरोनाविरोधातील या लढ्यात सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी केले आहे.

दोन सत्रांत हेल्‍पलाइन कार्यरत

या उपक्रमांतर्गत सकाळ सत्रात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत आणि सायंकाळच्‍या सत्रात दुपारी चार ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत मार्गदर्शन केले जाईल. मदत हवी असलेल्‍या इच्‍छुक नागरिकांना ऑडिओ अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तज्‍ज्ञ डॉक्टरांशी हेल्पलाइनवरून संपर्क साधता येईल. विलगीकरणात काय करावे/करू नये. विलगीकरणातील औषधोपचार आणि आहार. लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, गर्भवती महिला आणि कोव्हिड, लसीकरण, धोक्याची लक्षणे आणि डॉक्टरांना त्वरित कधी भेटावे या संदर्भात सल्‍ला प्राप्त करून घेता येईल.

यांना साधता येईल संपर्क

- डॉ. पूनम महाले ९१७२८२९१४२

- डॉ. सतीश पाटील ९८२३०५५१०७

- डॉ. नीलेश लुंकड ९३७१५७२९३७

- डॉ. अमृता हिरवे ८००७८८०७४८

- डॉ. दिनेश पाटील ९८२२६८३४००

- डॉ. पंकज गुप्ता ९८३४६१८१३३

- डॉ. जयराम कोठारी ९९२२४४१८५२

- डॉ. आनंद पारीख ९९३०३३९३६८

- डॉ. उमेश मराठे ९८२२०७३४६४ - डॉ. राकेश सिंह ९११२२९१९१८ - डॉ. श्रीया देसाई ७७२००७९५५५

- डॉ. स्वप्नांजली आव्हाड ८००७८६२६५९

- डॉ. पुष्पक पलोड ७५८८४२६९७७

- डॉ. जयराम कोठारी ९९२२४४१८५२〰㄰

loading image