सगळ्यांनी भोंगे खाली उतरवा... नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश

Masjid Loud Speaker Controversy
Masjid Loud Speaker ControversySakal

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापत चाललं आहे. मनसेने या मुद्द्याला अधोरेखित करत मुस्लीम समाजाने भोंगे न उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत भोंगे न उतरवल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यानंतर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनीक्षेपके उतरवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नाही, असं दिपक पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनधिकृत भोंग्यांबाबत परिपत्रक जारी करणारं नाशिक हे राज्यातील पहिलं शहर ठरलंय.

Masjid Loud Speaker Controversy
हनुमान चालिसाही पाच वेळा लावू!

राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यानंतर लगेच मनसेचे जिल्हाध्यक्ष हनुमान पवार यांनी भद्रकाली मंदिरात महाआरती केली. काही काळाने मुस्लीम समुदायाच्या व्यक्तींनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. त्यानुसार आजान पठण करणं आमची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं. दिवसातून पाच वेळा अजान पठण करण्याची आम्हाला परवानगी द्यावी, असं त्यांनी सांगितलं.

यानंतर मनसेने नाशिकमधील हेल्मेट सक्तीप्रमाणेच भोंग्यांवर बंदी आणण्याची मागणी केली. नंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. यापुढे कोर्टाने दिलेल्या डेसीबलच्या निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

अजान सुरू असताना हनुमान चालिसा पठणासाठी १०० मीटरचा नियम

वादामध्ये अडकलेले पोलीस आय़ुक्त दिपक पांडे यांनी देखील तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत सर्वच धर्माच्या व्यक्तींना लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अजान सुरू असताना मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा पठण करण्यास मनाई आहे. यासाठी कोणतीही परवानगी मिळणार नाही. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com