Crime
Crime esakal

Nashik Crime News : मनपा कर्मचार्याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Nashik News : धक्का लागण्यावरून झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकावर हल्ला केला. यात संशयिताने धारदार हत्याराने मारून मनपा कर्मचार्याचा खून केल्याची घटना घडली.

Nashik News : धक्का लागण्यावरून झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकावर हल्ला केला. यात संशयिताने धारदार हत्याराने मारून मनपा कर्मचार्याचा खून केल्याची घटना घडली. मंगळवारी (ता ३०) रात्री गोदाघाटावर सदरची घटना घडली होती. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली असून सरकारवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 arrested in connection with murder of municipal employee)

सनी फ्रान्सिस जॉन (३६, रा. बोधलेनगर, उपनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयुर फ्रान्सिस जॉन (रा. अनिकेश अपार्टमेंट, घाडगेनगर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा एका पान टपरीवर झाली असता पुन्हा वाद होऊन झटापट झाली.

मंगळवारी (ता. ३०) रात्री सनी त्याचे मित्र श्रेयस म्हस्के, सागर सोनवणे, अनिकेत सरोदे, रवी चव्हाण, अमोल चव्हाण यांच्यासोबत गोदाघाटावर पार्टी करीत असताना संशयित योगेश साळी, दादू पेखळे, यश भागवत, मयुर पठाडे, गणेश शिरसाठा व आणखी ४ ते ५ संशयितांच्या टोळक्याने मागील वादाची कुरापत काढून त्यांना मारहाण सुरू केली.

यावेळी एका संशयिताने त्याच्याकडील धारदार हत्याराने सनीवर वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यास मयत घोषित करण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Crime
Nashik Crime News : नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह तिघांना बेड्या!

कोणार्कनगरमधून अटक

गोदाघाटावरील खुनाची माहिती कळताच शहर गुन्हेशाखा युनिट एकचे पथक घटनास्थळी पोहोचले. संशयितांची माहिती मिळताच पथकांनी शोध सुरू केला. त्यावेळी संशयित मयुर राजेठ पठाडे, रोहित उर्प दादू सुधाकर पेखळे हे आडगाव हद्दीतील कोणार्कनगरमध्ये असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार महेश नांदूर्डीकर, सागर कुलकर्णी, कैलास शिंदे, राकेश शिंदे, कुणाला पचलोरे, गोरक्ष साबळे, अनिल मोरे, घनश्याम महाले, युवराज गायकवाड यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तपासाकामी दोघांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Crime
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com