Nashik Bike Theft : 2 दुचाकी चोरट्यांना अटक! 4 वाहने जप्त

Nashik News : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
Bike Theft
Bike Theftesakal

Nashik News : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अरुण बाळकृष्ण काकुळते (३९, रा. आनंदविहार, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर), पंकज दगडू सावंत (३८, रा. रोहिणी निवास, शिवाजीनगर) असे दोघा दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. (2 bike thieves arrested)

दिनेश कौतिक सोनवणे (रा. शिवाजीनगर) याची दुचाकी ( एमएच १८ एएच ८४३२) शनिवारी (ता.११) सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून गेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिस अंमलदार भागवत थविल यांना काही संशयित विना नंबर प्लेट दुचाकी फिरवत असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करीत संशयित अरुण काकुळते, पंकज सावंत यांना शिवाजीनगर परिसरातील सत्यम वाइन येथून ताब्यात घेतले. (latest marathi news)

Bike Theft
Wagholi Crime : मनी लॉन्डरिंगमध्ये पोलीस कारवाईची भिती दाखवत तरुणाची २९.४९ लाख रुपयांची फसवणूक

त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दिनेश सोनवणे यांची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ती दुचाकी जप्त केली. सखोल चौकशीमध्ये दोघांनी आणखी तीन दुचाक्या चोरी केल्याची कबुली देत यांच्याकडून त्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

संशयितांनी चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात विक्री केल्याचे तपासातून समोर येत आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार गिरीश महाले, गणेश रहेरे, नाईक मच्छिंद्र वाकचौरे, अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके यांच्या पथकाने केली.

Bike Theft
Nashik Crime News : महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com