
नाशिक : बँकेमध्ये खातेदारांच्या विमा योजनेच्या दाव्यांसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांद्वारे खातेदारांच्या विम्याच्या रकमा परस्पर वर्ग करून घेत तब्बल दोन कोटींचा बँकेला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडा कॉर्नरवरील पंजाब नॅशनल बँकेत हा प्रकार घडला असून, संशयितांनी कोट्यवधींची रक्कम १०६ तोतया वारसदार दाखवून त्या खात्यांवर वर्ग केली आहे.