
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याच्या तस्करीसह रोकडच्या वाहतुकीवरही पोलिसांकडून करडी नजर ठेवले जात आहे. सातपूर येथील नाकाबंदीत एका वाहनातून २० लाख ५० हजारांची अवैध रोकड जप्त केली आहे. तर, उपनगर हद्दीतही एका बिगारी काम करणाऱ्याच्या घरातून रोकड व दागिने असा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करण्यात आली आहे. (20 lakh cash seized in Satpur blockade )