Nashik Crime: फास्ट ट्रॅक कोर्टमुळे नराधम आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अवघ्या 7 महिन्यात निकाल

Crime News : कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला नाशिक जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Court Order
Court Orderesakal
Updated on

Nashik Crime News : पंचवटीतील पाथरवट लेन येथे शेजारी राहणाऱ्या अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीला बिस्कीट व मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला नाशिक जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना जुलै २०२३ मध्ये घडली होती. (Nashik Crime 20 years of hard labor for accused due to fast track court Abusing minor girl marathi news)

प्रकाश आबासाहेब ठोंबरे (४३, रा. पाथरवट लेन, पंचवटी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकल्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जुलै २०२३ रोजी आरोपी प्रकाश याने ६ वर्षांच्या चिमुकलीला बिस्किट देण्याचे व मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून त्याच्या घरात बोलाविले. त्यानंतर नराधम प्रकाश याने तिच्यावर लैंगिंक अत्याचार केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात पोस्कोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी, अंमलदार श्रीकांत कर्पे यांनी केला होता. आरोपीविरोधात सबळ पुरावे संकलित करून सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती पी.व्ही. घुले यांच्यासमोर खटला चालला.  (latest marathi news)

Court Order
Nashik Cyber Crime News : स्‍टॉक मार्केट ट्रेडिंगच्‍या बहाण्याने दोघांची 76 लाखांची फसवणूक

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना चव्हाण यांनी साक्षीदार व पंचांची साक्ष घेतली. यात आरोपीविरोधात आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व ५० हजारांचा दंड, दंड न भरल्यास १ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पैरवी अधिकारी मधुकर पिंगळे यांच्या मदतीने विशेष पाठपुरावा केला.

फास्ट ट्रॅक कोर्ट

चिमुकलीवरील अत्याचाराचा खटला जिल्हा न्यायालयातील विशेष सत्र न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर चालविण्यात आला. यासाठी पंचवटीचे विशेष पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात या खटल्याचा निकाल लागून नराधम आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली, यामुळे पीडित कुटूंबियांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे.

Court Order
Crime News: फरार असलेल्या अजित पवार गटाच्‍या जिल्हाध्यक्षाला अटक, काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com