
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत वर्षभरात नाशिक परिक्षेत्रात केलेल्या कारवाईमध्ये पोलिस विभागच लाचखोरीमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षात ३० पोलिस लाचखोरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लाचखोरांकडून ३८ लाख ४८ हजार ४५० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या वर्षात महापालिकेचे माजी अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे.