Nashik Crime News : सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण यांचा दणका; 52 गुन्हेगारांची तडीपारी

Crime News : परिमंडळ एकअंतर्गत म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २७ डिसेंबर रोजी सायंकाळी म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवर मद्याच्या नशेमध्ये सराईत गुन्हेगार लुटमारीचे प्रकार करीत होते.
Police Action
Police Actionesakal

Nashik Crime News : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी गुन्हे दाखल नसताना परंतु सराईत गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्या ६ जणांना एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांशी जवळीक ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Crime 52 Tadipaar of 6 friends of criminals marathi news)

परिमंडळ एकअंतर्गत म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २७ डिसेंबर रोजी सायंकाळी म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवर मद्याच्या नशेमध्ये सराईत गुन्हेगार लुटमारीचे प्रकार करीत होते. त्यावेळी त्याच रस्त्याने सेवानिवृत्ती लष्करी जवान रवीदत्त चौबे हे जात होते. त्यांनी संशयितांना हटकले असता, त्यावेळी संशयितांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात चौबे यांच्या वर्मी घाव बसल्याने ते जागीच गतप्राण झाले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे.

मात्र, सदरची घटना घडण्यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांसमवेत त्यांचे सहा मित्र दारुपार्टी करीत होते. चौबे खुनप्रकरणात तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यांच्या सहा मित्रांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तसेच त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

मात्र, त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी त्या सहा जणांची एका वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश जारी केले आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांसोबत वावरणार्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. (Latest Marathi News)

Police Action
Nashik Crime News : दीड महिन्यात साडेतीन कोटींचा अवैध मद्यसाठा, गुटखा जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

यांची केली तडीपारी

जय पंजाब मोहिते, उमेश सुरेश वाघ, प्रशांत उर्फ स्वप्निल तुकाराम डंबाळे, फिरोज सलिम शेख, रोहित गोटीराम बोराडे, जयशंकरसिंग देवेंद्रसिंग राजपूत

चार महिन्या ५२ तडीपार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गतच गेल्या जानेवारी ते आत्तापर्यंत आयुक्तालयातील परिमंडळ एकअंतर्गत ५२ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

"सराईत गुन्हेगारांसमवेत राहून सामाजिक शांतता भंग करण्याची शक्यता गृहित धरून अशा गुन्हेगारांच्या मित्रांविरोधात यापुढे कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. त्याअंतर्गतच सहा जणांना एका वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले आहे."

- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

Police Action
Crime News : मेहंदीचा रंग उतरण्याआधी तिन्ही ‘वधू’ गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com